Posts

Showing posts with the label coolbreeze

वेंगुर्ले बंदर, सिंधुदुर्ग

Image
‘वेंगुर्ले बंदर’सिंधुदुर्ग जिल्हा.......... वेंगुर्ले बंदर म्हणजे पूर्वीची प्रसिद्ध उतारपेठ होती. स्वातंत्र्यपूर्व काळात वेंगुर्ला ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठी बाजारपेठ होती. व्यापारी खूप दूरून येथे यायचे. येथील वैभवशाली मुंबई बाजार म्हणजे आताचे माणिक चौक दिमाखात प्रचंड व्यापाराची उलाढाल करीत होते. अर्थात या सर्व उलाढालीचे स्त्रोत होते वेंगुर्ले बंदर. त्यावेळी मच्छीमारी नौका, गलबते (पूर्वी त्यांना ‘तारु’ म्हणत) ती सुव्यवस्थितरीत्या वेंगुर्ले बंदरातून ये-जा करीत होती. कालांतराने व्यापारी जहाजांची ये-जा व त्यानंतरही सुरू असलेली प्रवासी बोट व्यवस्था बंद झाल्याने हे बंदर दुर्लक्षित होत गेले. सद्यस्थितीत मच्छीमारीसाठी या बंदराचा उपयोग सुरू आहे. कोकणातील बंदरे विकसित झाल्यास किनारपट्टी भागाबरोबरच कोकणचाही कायापालट होईल. ज्यावेळी रस्ते नव्हते, त्यावेळी वेंगुर्ले बंदरातून बरीच वाहतूक होई. म्हणूनच साधारणत: ७० ते ८० वर्षापूर्वी वेंगुर्ले बाजार म्हणजे रात्री १ वाजेपर्यंत चालणारा बाजार होता. परंतु, कालांतराने गलबते व त्यानंतर प्रवासी बोट वाहतून बंद झाली आणि या बंदराला उतरती कळा ला...