कुडाळ
कुडाळ
कुडाळ हा सिंधुदुर्ग जिल्यातील एक तालुका आहे. कुडाळ मध्ये आकेरी , कसाल , माणगांव , केळूस , बिभावाने ,तेंडोली , ओरोस , पिंगुळी , शिवापूर , आंदुर्ले , झाराप अश्या प्रसिद्ध गावांचा समावेश होतो. कुडाळात जायचा झाला तर कुडाळ रेल्वे स्टेशन , झाराप रेल्वे स्टेशन ला उतरून कुडाळ तालुक्यात फिरता येते.
सुनियोजित शहर - सिंधुदुर्गनगरी
कुडाळ पासून १३ किमी अंतरावर असेलेल्या शहरात सिंधुदुर्ग जिल्याचे मुख्यालय आहे. यापूर्वी ओरोस हे मुख्यालय होतो. हे महाराष्ट्रातील पहिले सुनियोजित शहर.
पर्यटन स्थळे -
नेरूर -
कुडाळ वरून मालवण ला जाताना धामापूर मार्गे कर्ली नदी लागते. नेरूरपारच्या पुलावरून जाताना नदीचे निसर्गरम्य सौंदर्य हे बघणासारखे असते. छायाचित्रकारांना इथे थांबून छायाचित्र घेण्याचा आपल्या कॅमेरात निसर्ग टिपण्याचा मोह तर आवारातच नाही.
नेरूर हे गाव तिन्ही बाजूने नदीने वेढलेले आहे. या गावात सुंदर असे महालक्ष्मी चे मंदिर आहे.
कलेश्वर देवस्थान -
कुडाल तालुक्यातील नेरूर चवाटा येथे कलेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. या मंदिराचे विशेष महत्व म्हणजे येथील शिवपिंड ही चौकोणी आकाराची आहे. त्याच बरोबर मंदिराचे कोरीव काम कलाकुसर बघण्यासारखे आहे.मंदिरात ६ खांब अप्रतिम कोरलेले आहेत.
ऐतिहासिक शिवापूर - शिवापूर ला ऐतिहासिक तसेच प्रेक्षणीयस्थळ म्हणून ही ओळखले जाते. शिवापूर हे एक थंड हवेचे ठिकाण ही आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये सह्याद्री डोंगराच्या कुशीत वसले आहे. आणखी एक महत्व म्हणजे कर्ली नदीचे हे उगमस्थान आहे. येथून मनोहरगड आणि संतोषगड दिसतो. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते.
मनोहरगड आणि संतोषगड -
मनोहरगड आणि संतोषगड हे कुडाळपासून ४२ किमी अंतरावर सह्याद्री च्या कुशीत आहेत. येथे शिवापूर या गावातून जाता येते.
. . . . . . . . . . . . . . . . . . . आजच्या भागात इथेच थांबू पुढील भागात आपण यापुढे पाहूया.

Comments
Post a Comment